कुर्ला पाईपलाईन रस्‍ता अखेर सुरु

कुर्ला पाईपलाईन रस्‍ता अखेर सुरु

Published on

मुंबई, ता. १८ : कुर्ला काजूपाडा येथील पाईपलाईन रस्‍त्‍याचे रुंदीकरण होऊनही तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्‍हता. त्‍यामुळे स्‍थानिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत होती. याची दखल घेऊन येथील माजी मंत्री नसीम खान यांनी स्‍वतः पुढाकार घेऊन सदरील रस्‍ता वाहतुकीसाठी सुरू केला.
या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणासाठी नसीम खान यांनी अनेक वर्षे पुढाकार घेतला होता. मात्र काही व्यापाऱ्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेल्यामुळे सदरील रस्‍त्‍याचे काम रखडले होते. उच्च न्यायालयात खान यांनी पाठपुरावा करून रस्ता रुंदीकरणाचे व सिमेंट काँक्रिटीकरणाचे आदेश मिळवले. त्यामुळे महापालिका स्तरावर हे काम पूर्ण करण्यात आले. तरीही रस्ता वाहतुकीस खुला होत नव्हता. हा रस्ता सेंट ज्यूड्स हायस्कूल व बेदी हॉल या दोन्हीही ठिकाणी अनधिकृत बॅरिकेड्स व खाजगी बाउन्सर उभे करून नियमबाह्य पद्धतीने बंद करून ठेवण्यात आला होता. त्‍यामुळे अनेक शाळकरी मुलांसह पालकांना, नोकरदार वर्गाला मोठा वळसा घालून जावे लागत होते. अखेर या संदर्भात नसीम खान यांनी पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.