भंगारविक्रेते पालिकेच्या रडारवर ;  जाळ्या विकत घेतल्यास गुन्हे दाखल करणार ;

भंगारविक्रेते पालिकेच्या रडारवर ; जाळ्या विकत घेतल्यास गुन्हे दाखल करणार ;

Published on

भंगारविक्रेते पालिकेच्या रडारवर
जाळ्या विकत घेतल्यास गुन्हे दाखल करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील पर्जन्यजल, मलनि:सारण आणि इतर सेवांसाठी असलेल्या वाहिन्यांवरील प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सशी निगडित जाळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या जाळ्या खरेदी करणारे भंगारविक्रेते महापालिकेच्या रडारवर आले आहेत. चोरीच्या जाळ्या विकत घेणाऱ्या भंगारविक्रेत्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

मुंबईतील सर्व भंगार खरेदीदारांना महापालिका प्रशासनाने कारवाईबाबत सूचित केले आहे. कोणीही मलवाहिनीवरील किंवा पर्जन्य जलनिःसारण वाहिनीवरील चोरीला गेलेली, गहाळ झालेली डी. आय. किंवा सी. आय. बनावटीची झाकणे खरेदी करू नयेत; अन्यथा या बाबींचे उल्लंघन करणाऱ्या सर्व संबंधितांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा फौजदारी गुन्हा असून भारतीय दंडसंहिता कलम ४११, ४१२, ४१३, ४१४ नुसार दंडनीय अपराध आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईतील पर्जन्य जल, मलनिसारण व इतर सेवांसाठी असलेल्या वाहिन्यांवरील प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोलशी निगडित दुर्घटना टाळण्‍यासाठी महापालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागाने संरक्षक जाळ्यांची स्‍वतंत्र प्रतिकृती विकसित केली आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात टप्प्यांनुसार पद्धतीने मॅनहोलवर जाळी बसवण्याची कार्यवाही यंदापासून सुरू करून पुढील पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कास्ट आयर्न, माइल्ड स्टील, स्टेलनेस स्टील अशा विविध पद्धतीच्या धातूंचा वापर करून या संरक्षक जाळ्या तयार केल्या आहेत.
....................
आयुक्तांचे सर्वेक्षणाचे निर्देश
महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मॅनहोल आणि चेंबरच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनीही विशेष बैठकीत सर्व मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळी बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.