‘संगीत संयुक्त मानापमान १०१’ निमित्त आज विशेष कार्यक्रम

‘संगीत संयुक्त मानापमान १०१’ निमित्त आज विशेष कार्यक्रम

Published on

‘संगीत संयुक्त मानापमान १०१’निमित्त आज विशेष कार्यक्रम
मुंबई, ता. ६ : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘संगीत संयुक्त मानापमान’ या नाटकाच्या प्रयोगास १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी, ७ जुलैला सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांचीही उपस्थिती राहणार आहे. ‘संगीत संयुक्त मानापमान’च्या ऐतिहासिक प्रयोगाच्या इतिहासाचे नाट्य रूपांतर या वेळी सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.