गुटखा

गुटखा

Published on

गुटखा उत्पादक जगदीशप्रसाद जोशीला सशर्त जामीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : गुटखा उत्पादक जगदीशप्रसाद मोहनलाल जोशीला (६८) मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे.
पाकिस्तानमध्ये फायर गुटखा कंपनी सुरू करण्यासाठी जोशी याने गँगस्टर दाऊद इब्राहिमला मदत केल्याच्या आरोपात जोशीला सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार दहा वर्षे कारावासाची सजा सुनावली आहे. गोवा मसालाचा मालक असलेल्या जोशीला न्या. भारती डांग्रे यांनी एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

जोशीच्या वतीने ॲड. आबाद पोंडा आणि ॲड. सुभाष जाधव यांनी बाजू मांडली. जोशीला चुकीच्या पुराव्यांवरून दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला दाऊदच्या एका साथीदाराकडून धमक्या येत होत्या आणि तो या प्रकरणात पीडित आहे, असा युक्तिवाद त्याच्या वतीने करण्यात आला. जोशीसह अन्य दोघांना मोक्कानुसार दोषी ठरवण्यात आले आहे.

सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावलेली शिक्षा स्थगित करून अंतरिम जामीन देण्याची मागणी याचिकेवर केली होती. या याचिकेवर यापूर्वी खंडपीठापुढे सुनावणी झाली होती; मात्र खंडपीठाने प्रकरण एकल न्यायाधीशांकडे वर्ग केले. त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायालयाने त्यांना वय आणि आजारांमुळे जामीन मंजूर केला होता. या जामिनाच्या शर्ती उच्च न्यायालयाने सोमवारी निश्चित केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.