हत्तीरोगाने १८ जिल्हे अजूनही प्रभावित

हत्तीरोगाने १८ जिल्हे अजूनही प्रभावित

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी मुंबई वगळून १८ जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव कायम आहे. हत्तीरोगाच्या लक्षणांनुसार केलेल्या विभागणीत हत्तीपाय रुग्णांची संख्या ३०,३३४; तर अंडाशयवृद्धी रुग्णांची संख्या ७,२५६ इतकी नोंदवण्यात आली आहे.

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यात १९५७ पासून सुरू झाला; तरीही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, नांदेड, नंदुरबार, अकोला व पालघर या ठिकाणी हत्तीरोगाचा प्रादुर्भाव कायम आहे. हत्तीरोग बाधित रुग्णांना सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. राज्यांत या रोगावर केलेल्या उपाययोजनांमुळे जळगाव, वर्धा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या आठ जिल्ह्यांमध्ये व ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुका, यवतमाळ जिल्ह्यात हत्तीरोग हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.

१६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील हत्तीपाय आणि अंडवृद्धी (हायड्रोसील) असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. २०२३ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात हत्तीपायाचे ३०,३३४ आणि अंडवृद्धीचे ७,२५६ रुग्ण आढळले आहेत. सरकारमार्फत अंडवृद्धी झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया; तर हत्तीरोगामुळे अंडवृद्धी झालेल्या रुग्णांना शोधून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येते. जून २०२३ अखेर राज्यामध्ये १,३६४ एवढ्या अंडवृद्धी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

कसा होतो हत्तीरोग?
१) हत्तीरोग वुचेरिया बॅकोप्टाय व ब्रुगिया मलायी नावाच्या परजीवीमुळे होतो.
२) क्युलेक्स डासाची दूषित मादी चावल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव होतो.

काय आहेत लक्षणे?
सुरुवातीच्या काळात ताप व अंगदुखी अशी लक्षणे या आजारात आढळतात. हत्तीरोग जाल लसिका वाहिन्या व ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे काही वर्षांनंतर रुग्णांच्या हाता-पायावर सुज येते, तसेच पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सुज येते. यामुळे रुग्णाचा मृत्यू होत नसला तरी पायाला, अंडाशयाला विकृती निर्माण होते.
      
एमडीए कार्यक्रम
२०२२ मध्ये ५ जिल्ह्यात (ठाणे, पालघर, नंदुरबार, नागपूर, यवतमाळ) एम. डी. ए. कार्यक्रम (सामूहिक औषधोपचार) राबविण्यात आला. त्यात ४९ लाख ५७ हजार ४१७ नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या देण्यात आल्या. फेब्रुवारी २०२३ मध्ये ४ जिल्ह्यात (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा) एम. डी. ए. कार्यक्रम राबवला. त्यात २७ हजार ३४ हजार २९६ जणांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या देण्यात आल्या.

हत्तीरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यातील यंत्रणा
हत्तीरोग सर्वेक्षण पथके - ६
हत्तीरोग नियंत्रण पथके - १६
हत्तीरोग रात्रचिकित्सालये - ३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com