

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या काळात लोक कुटुंबीयांसह तीर्थक्षेत्राला जाण्याचे नियोजन करतात. हे लक्षात घेत एसटी महामंडळाने भाविकांसाठी ‘एसटीसंगे तीर्थाटन’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महामंडळ धार्मिक सहलींचे आयोजन करणार आहे.
एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. या सहलीमध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जातात. ज्येष्ठांना मोफत तर महिलांना तसेच १२ वर्षांच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे. त्यामुळे एसटीची ही सहल अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. अष्टविनायक, पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर, ११ मारुती दर्शन, कोल्हापूर-जोतिबा अशा अनेक तीर्थक्षेत्रांच्या सहलीचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक गावातून महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. सवलती दिल्यामुळे अत्यंत माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सर्वसामान्यांना मिळत आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्नात भर पडणार असल्याचा एसटी महामंडळाचा विश्वास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.