ग्राहकांच्या दारात जाऊन रेनॉ इंडियाची सेवा

ग्राहकांच्या दारात जाऊन 
रेनॉ इंडियाची सेवा
Published on

मुंबई, ता. १८ ः ‘रेनॉ इंडिया’ या फ्रेंच मोटार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रात ‘शोरूम ऑन व्हील्स’ आणि ‘वर्कशॉप ऑन व्हील्स’ हे दोन उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यायोगे ग्राहकांना आपल्या घराजवळच्या केंद्रातच गाडीची दुरुस्ती- देखभाल करता येईल. तसेच रेनॉच्या शोरूमचा अनुभवही आपल्या घराजवळ घेता येईल.
महाराष्ट्रात ‘रेनॉ एक्सपिरियन्स डे’ ही मोहीम हाती घेतली जाईल. ‘शोरूम ऑन व्हील्स’ हा उपक्रम महाराष्ट्रात ३१ ठिकाणी केला जाईल. हा उपक्रम म्हणजे रेनॉल्टच्या शोरूमचे एक्सटेन्शन असेल, जेथे ही शोरूम नसतील अशा ठिकाणी मोठ्या वाहनात हे शोरूम उभारून ते सर्वत्र नेले जाईल. त्यायोगे नागरिकांना प्रत्यक्ष मोटार पाहण्याची, तसेच टेस्ट ड्राईव्ह अनुभवण्याचीही संधी मिळेल व मोटारीचे बुकिंगही करता येईल. त्यासाठी अर्थसाह्यची व्यवस्थाही तिथे होईल, असे ‘रेनॉ इंडिया’चे कंट्री सीईओ आणि एमडी वेंकटरामन मामीलापल्ले यांनी सांगितले.
-------
इथेनॉलवरील गाडी येणार
‘वर्कशॉप ऑन व्हील्स’ या उपक्रमामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे तंत्रज्ञ अन्य ठिकाणी जाऊन रेनॉ मोटारींची दुरुस्ती आणि देखभाल, सर्व्हिसिंग करतील. रेनॉ ट्रायबरला ग्लोबल एन.सी.पी.ए. चे प्रौढ प्रवाशांसाठीचे फोर स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या गाडीसाठीही रेनॉचे प्रयत्न सुरू आहेत. यथावकाश विजेवर चालणाऱ्या, तसेच सीएनजीवर चालणाऱ्या मोटारीही बाजारात आणल्या जातील, असेही वेंकटरामन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com