आयटीआयच्या विद्यावेतनात वाढ

आयटीआयच्या विद्यावेतनात वाढ

Published on

मुंबई, ता. १८ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना (प्रशिक्षणार्थी) दरमहा ५०० रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे. यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरिता व इतर आवश्यक खर्चाकरिता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षांत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चात झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती. त्यासाठी संचालनालयाने वेळोवेळी पाठपुरावा करत हे विद्यावेतन वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येईल. यासाठी वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या मर्यादेत असण्याची अट आहे. याकरिता शासनावर दरवर्षी ७५.६९ कोटींचा आर्थिक भार पडणार आहे.
----
आत्तापर्यंत शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना दरमहा केवळ ४० रुपये इतके विद्यावेतन मिळत होते. त्यासाठी संचालनालयाने वेळोवेळी पाठपुरावा केल्याने यात सरकारने सकारात्मक असा निर्णय घेत ४० रुपयांवरून थेट ५०० रुपये इतकी भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सर्व घटकातील विद्यार्थ्यांना मोठे बळ मिळणार आहे.
- दिगंबर दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com