मुंबईत ५-जी रुग्णवाहिका

मुंबईत ५-जी रुग्णवाहिका

Published on

मुंबई, ता. १८ : मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच स्मार्ट रुग्णवाहिका धावताना दिसणार आहेत. ५-जी तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही रुग्णवाहिका सामान्य रुग्णवाहिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या रुग्णवाहिकेतील आधुनिक वैशिष्ट्यांच्या मदतीने रुग्णालयात बसलेल्या डॉक्टरांना रुग्णवाहिकेतील रुग्णाची स्थिती त्वरित कळू शकणार आहे. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी ही रुग्णवाहिका खूप उपयुक्त ठरेल.
५-जी सेवेमुळे आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होताना दिसत आहेत. हेल्थकेअर क्षेत्रात काम करणाऱ्या झेन्झो या संस्थेने मुंबईत पहिली आणि अनोखी ५-जी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १८) तिचे अनावरण झाले. या अत्याधुनिक ५ - जी रुग्णवाहिकेला हायटेक उपकरणे बसवली आहेत. ही रुग्ण निरीक्षण आणि टेलिमेट्री उपकरणांनी सुसज्ज आहे. यामुळे रुग्णाच्या आरोग्याचा रिअल टाईम डेटा रुग्णालयापर्यंत पोहोचत राहणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी लोक झेन्झो अॅप वापरू शकतात.
रुग्णवाहिकेतल मॉनिटरद्वारे डॉक्टरांशी थेट संवाद साधता येणार आहे. डॉक्टर मार्गदर्शन करू शकतील; तसेच सुविधांची आगाऊ व्यवस्था करू शकतील, असे झेन्झो मेडिकल सर्व्हिसेसचे प्रमुख डाॅ. नरसिंह आरोलकर यांनी सांगितले.
...
आपत्कालीन वॉर्डप्रमाणे काम
झेन्झोच्या संचालक श्वेता मंगल यांनी सांगितले की, ५-जी रुग्णवाहिकेत पॅरामेडिक कर्मचाऱ्यांसाठी ऑनबोर्ड कॅमेरे, कॅमेरा-आधारित हेडगियर आणि बॉडी कॅम असतील. रुग्णालयात बसून डॉक्टरांना उपचारांबाबत मार्गदर्शन करता येईल. संपूर्ण आयसीयू सेटअप असलेली रुग्णवाहिका रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डप्रमाणे काम करेल.
...
५० रुग्णवाहिका तयार करणार
मुंबईत ५-जी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ५० रुग्णवाहिका असतील. रुग्णवाहिकेतील रुग्णांची माहिती रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालये ऑन बोर्ड आणली जात आहेत. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती मिळू शकेल. यासाठी रुग्णालयांकडून आपत्कालीन विभागाचा मोबाईल क्रमांक मिळवला जाईल, जेणेकरून त्यांना रुग्णांची स्थिती जाणून घेता येईल. झेन्झोच्या कंट्रोल रूममधून पाठवलेल्या लिंकद्वारे रुग्णाची स्थिती डाॅक्टरांना जाणून घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com