वाचन प्रेरणा दिनाचा अद्याप सुचना नाहीत

वाचन प्रेरणा दिनाचा अद्याप सुचना नाहीत

मुंबई, ता. १३ : माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यात साजरा करण्यात येणारा वाचन प्रेरणा दिन हा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये साजरा करावा, यासाठी कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचा दावा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांनी केला आहे.
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो; मात्र या दिवशी यंदा रविवार हा सुट्टीचा दिवस आल्याने या दिवशी आम्ही वाचन प्रेरणा दिन कसा साजरा करायचा, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. त्यासोबतच हा दिवस साजरा करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने आम्हाला काहीतरी नियोजन आणि त्या संदर्भात सूचना देणे आवश्यक होते; परंतु कोणत्याही सूचना आणि आदेश आम्हाला मिळाल्या नसल्याने या दिवसावरून सर्वत्र संभ्रम असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. राज्यातील शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवस अगोदरच सूचना दिल्या जातात; परंतु या वेळी कोणत्याही सूचना शाळांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांतीचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला एक मोठा पाठिंबा मिळतो. विद्यार्थ्यांमध्ये यामध्ये आकलन शक्ती आणि वाचनाची आवड निर्माण होते. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने शालेय शिक्षण विभागाकडून राज्यभरातील सर्वच शाळांसाठी कार्यक्रम त्याची रूपरेषा आणि एक निश्चित असे वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे; परंतु ते न केल्याने मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे हा वाचन प्रेरणा दिन कसा साजरा करायचा, असा प्रश्न राज्यातील शाळांमध्ये उपस्थित झाला असल्याचे घागस म्हणाले.

...
एक दिवस अगोदर जीआर
शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थी हिताचे निर्णय घेताना कायम दुर्लक्ष होते. महापुरुषांचे विविध दिवस, वार्षिक अभियाने यासाठी एक दिवस अगोदर जीआर काढले जातात. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या अभियानाची नीट अंमलबजावणी होत नाही. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने किमान काही दिवस सूचना देणे आवश्यक होते, असेही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com