कमांड सेंटर प्रशिक्षण केंद्राचे सिमेंट काँक्रीटीकरण

कमांड सेंटर प्रशिक्षण केंद्राचे सिमेंट काँक्रीटीकरण
Published on

मुंबई, ता. १७ : आर/मध्य विभागातील बोरिवली (पश्चिम) येथील न्यू लिंक रोडवरील कमांड सेंटर प्रशिक्षण केंद्राचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमन दल विभागाने हा प्रस्ताव तयार केला होता. यामुळे कमांड सेंटर प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध सुविधा प्राप्त होणार आहेत.

कमांड सेंटर प्रशिक्षण केंद्राच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव इमारत परिरक्षण विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना प्राप्त झाला होता. त्याअनुषंगाने यावर पर्जन्य जलवाहिनी कार्यालयाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर स्थळ पाहणी करून आवश्यकतेनुसार कामाचे अंदाजपत्रक तयार केले. अंदाजपत्रकास उपमुख्य अग्निशमन अधिकारी (परिमंडळ- ७) यांनी मान्यता दिली आहे. पालिका यावर ५,९२,७५,३३५ कोटी रुपये खर्च करत आहे. या कामाकरिता ‘ई’ निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याला ८ निविदाकारांनी प्रतिसाद दिला. छाननीअंती या सर्व निविदा प्रतिसादात्मक ठरल्या. त्यातील मेसर्स ॲक्युट डिझाईन्स यांनी कामास नमूद केलेला दर लघुत्तम ठरला.
.......
अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलेली प्रस्तावित कामे
- बोरिवली कमांड सेंटर प्रशिक्षण केंद्राचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
- पर्जन्य जलवाहिन्याचे बांधकाम करणे.
- अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे.
- उपयोगिता वाहिन्यांचे (duct) बांधकाम करणे.
- आवश्यकतेनुसार ड्रील टॉवरची संरचनात्मक व सामान्य दुरुस्ती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com