एचएसबीसी क्रेडिट कार्डवर अनेक सवलती

एचएसबीसी क्रेडिट कार्डवर अनेक सवलती
Published on

मुंबई, ता. २८ : ‘एचएसबीसी इंडिया’ने आज (ता. २८) आपल्या एचएसबीसी प्रीमियर क्रेडिट कार्ड आणि एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्ड या क्रेडिट कार्डांवर अनेक सुविधांची घोषणा केली. या अपग्रेडेड एचएसबीसी प्रीमियर क्रेडिट कार्डवरून उच्चभ्रू ग्राहकांना प्रवास व अन्य मोठ्या खर्चांसाठी जादा चैनींच्या स्वरूपातील लाभ तसेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

प्रीमियर क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना काही आकर्षक प्रवर्गांमध्ये एका रिवॉर्ड पॉइंटमागे एक रुपया मिळेल. प्रीमियर क्रेडिट कार्डधारकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान अमर्यादित स्वरूपात लाऊंज प्रवेशाची सुविधा मिळेल. दरवर्षी आठ आंतरराष्ट्रीय प्रवासांदरम्यान आपल्या पाहुण्यांसह लाऊंज भेटीची सुविधाही मिळेल; तर सामान्य क्रेडिट कार्ड ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले नवीन एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्ड हे डायनिंग, फूड डिलिव्हरी आणि किराणा मालाच्या खरेदीवर १० टक्के कॅशबॅक देऊ करते. हा लाभ प्रत्येक स्टेटमेंटमध्ये जास्तीतजास्त १००० रुपयांपर्यंत दिला जाईल. त्याचप्रमाणे अन्य खर्चांवर अमर्यादित स्वरूपात १.५ टक्के कॅशबॅक मिळेल, असे एचएसबीसी इंडियाच्या वेल्थ अँड पर्सनल बँकिंग विभागाचे प्रमुख संदीप बत्रा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com