

मुंबई, ता. २८ : आयआयटी मुंबईत पहिल्या ‘सेमीएक्स’ परिषदेला सुरुवात झाली असून ही परिषद २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या परिषदेत आयआयटी मुंबईमध्ये सेमीएक्स सेंटर फॉर सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी यांच्या वतीने सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव, एस. कृष्णन आणि आयआयटी मुंबईच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा विभागाचे उपसंचालक प्रा. एस. सुदर्शन, प्रा. उदयन गांगुली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या परिषदेत शैक्षणिक विषय, भारतीय सेमीकंडक्टर ग्राहक आणि निर्माते, शैक्षणिक आणि गुंतवणूकदार, सरकारी उद्योजक, गुंतवणूकदार, नीती रचनाकार तसेच अनेक उद्योजक सामील झाले आहेत. या परिषदेचे प्रमुख पाहुणे एस. कृष्णन म्हणाले, ‘शैक्षणिक, उद्योग आणि सरकार यांच्यातील सहकार्यासाठी ‘सेमीएक्स’मध्ये जे प्रयत्न केले जात आहेत ते देशातील इतर शैक्षणिक संस्थांमध्येही वाढावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही एका ऐतिहासिक उंबरठ्यावर आहोत. हा उपक्रम भारतातील उर्वरित सेमीकंडक्टर उद्योगासह वाढेल.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.