

मुंबईतील तापमान घसरण्याचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.३ : सोमवारपासून मुंबईतील तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानात बदल होणार असल्याने तापमान घसरणार आहे. असे ‘मुंबई रेन’ने सांगितले आहे.
गेल्या केवळ २ दिवसांत तापमान २४ अंशांवरून १६ अंशांपर्यंत खाली जाईल, असा अंदाज आहे. उत्तर कोकणात थंड व कोरडे वारे सक्रिय होणार आहेत. परिणामी आर्द्रतेत मोठी घट दिसून येईल, ज्यामुळे थंड हवामानासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. ही थंडी आणखी काही दिवस टिकेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे उष्णतेपासून सुटका होईल असा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमानात ७ ते ८ अंशांची घसरण अपेक्षित आहे. बुधवारपर्यंत कमाल तापमानात घट होईल. तापमान ३५ अंश सेल्सिअसवरून तापमान थेट ३० अंश सेल्सिअसच्या खाली जाईल. यामुळे मुंबईला उष्णतेपासून दिलासा मिळेल.
......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.