जांबोरी मैदानात माता रमाई यांची जयंती

जांबोरी मैदानात माता रमाई यांची जयंती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती, त्याचबरोबर माता रमाई यांची १२६वी जयंती, तसेच दोघांचा ११८वा लग्नाचा वाढदिवस असा एकत्र सोहळा वरळीच्या जांबोरी मैदानात साजरा केला जाणार आहे. भीमोत्सव समन्वय समिती वरळी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ६) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या जयंती उत्सवाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लग्नाचा वाढदिवस सोहळा एकत्रितपणे साजरा करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या निमित्ताने १३३ किलोचा केक, डोळ्याचे पारणे फिटणारी आतषबाजी, अवकाशातून होणारी पुष्पवृष्टी या कार्यक्रमात केली जाणार आहे. गायक संदेश विठ्ठल उमप, शकुंतला जाधव, शिरीष पवार, इंडियन आयडॉलफेम मुकेश पांचोली, प्रवीण डोणे, बिग बॉसफेम मेघा घाडगे, अनुजा कामत यांचे गायनाचा कार्यक्रमही होणार आहे.
..........
पैठणी आणि बक्षिसे
महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व त्यांचे पालक यांना लाखोंची बक्षिसे, पैठणी, सुटाचे कपडे, सोन्याची नथनी, चांदीचे नाणे, शालेय साहित्य, नऊवारी लुगडी, हजारो रुपयांचे गिफ्ट व्‍हाऊचर लकी ड्रॉच्या माध्यमातून महाराष्ट्र बाजारपेठ, दादर यांच्याकडून देण्यात येणार आहे. समता चषक २०२४ ही राष्ट्रीय दर्जाची बुद्धिबळ स्पर्धाही जांबोरी मैदानातील अंबिका माता भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम समन्वयक डॉ. विजय कदम यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com