शेवटच्या दिवशी ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल

मुंबई, ता. ४ : राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील आठ लोकसभा मतदारसंघांत २६ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. सायंकाळपर्यंत एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा यात सामावेश आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com