मेंदूच्या दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया यशस्वी

मेंदूच्या दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया यशस्वी

३१ वर्षीय महिलेला ऑटोइम्यून एन्सेफलायटीस, तरुण रुग्णांमध्ये होतो आजार


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : ‘ऑटोइम्यून एन्सेफलायटीस’ या दुर्मिळ आजाराने पीडित असलेल्या महिलेवर यशस्वी उपचार करत तिला नवे आयुष्य मिळवून देण्यात डॉक्टरांना यश आले. प्रारंभी स्ट्रोक असल्याचे निदान करून त्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर दिवसेंदिवस गुंतागुंत वाढत गेली.

डॉ. पवन पै (सल्लागार, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट) यांनी या ऑटोइम्यून एन्सेफलायटीसचे अचूक निदान करत रुग्णावर यशस्वी उपचार केले. ३१ वर्षीय महिला निकिता कुमारी हिला उजव्या बाजूला हात फिरवण्यास त्रास होत होता. त्यानंतर तिला चेहऱ्याच्या आणि शरीराच्या उजव्या भागाच्या वरच्या अंगाला अपस्माराचा झटका आला. तिच्या ‘सीएसएफ ऑटोइम्यून एन्सेफलायटीस’ चाचणीत अँटीबॉडीज आढळून आले होते. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी जेव्हा निदान करण्यात आले, त्यावेळी तिला एनएमडीए रिसेप्टर ऑटोइम्यून एन्सेफलायटीसचे असल्याचे स्पष्ट झाले.

डॉ. पवन पै यांनी सांगितले की, ऑटोइम्यून एन्सेफलायटीस म्हणजे मेंदू आणि चेतापेशींमध्ये ॲण्टीबॉडीज तयार होतात. जेव्हा कोणताही विषाणू संसर्ग होतो तेव्हा शरीर त्या विषाणू आणि बॅक्टेरियाविरूद्ध ॲंटीबॉडीज तयार करते. कधीकधी त्या ॲण्टीबॉडीजचा आपल्या मेंदूच्या पेशींवर हल्ला होतो. ही स्थिती सहसा २० ते ४० वर्षे वयोगटातील तरुण रुग्णांमध्ये होते. ही स्थिती नैराश्यासारख्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरते.

जानेवारी २०२४ मध्ये, रुग्णाला असामान्य न्यूरोलॉजिकल लक्षणे आढळली जसे की स्पीच अरेस्ट, ती काय सांगण्याचा प्रयत्न करत होती त्याचा तिला विसर पडू लागला. तसेच रुग्णाला संवादात अडथळे आणि शारीरिक असंतुलनासारखी समस्याही उद्भवू लागली. त्यानंतर तिच्या मेंदूत नवीन जखमही दिसून आली. त्यामुळे उपचार म्हणून आयव्ही स्टिरॉइड्स सुरू करण्यात आले. तिच्यावर योग्यवेळी उपचार न केल्यास तिला अपस्माराचे झटके आणि मेंदूचे कायमचे नुकसान झाले असते, असेही डॉक्टरांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com