अदाणी फाऊंडेशनचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

अदाणी फाऊंडेशनचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

अदाणी फाऊंडेशनचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर
मुंबई, ता. १ : अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाऊंडेशन यांनी त्यांचा सीएसआर उपक्रम उत्थानमार्फत नुकतेच मुंबईच्या महापालिका शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांची शिक्षणक्षमता आणि निर्णयक्षमता वाढवण्यासाठी त्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीची माहिती दिली गेली. त्याचप्रमाणे मुलांची शाळेतून होणारी गळती थांबावी, यासाठीही प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मूलभूत शिक्षण आणि गणिती कौशल्य वाढावे, यासाठी शिक्षक, तसेच पालकांबरोबर संयुक्त उपक्रमही हाती घेतले जातात. आतापर्यंत ‘उत्थान’ने ६० महापालिका शाळांमधील बारा हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या विकासासाठी भरीव साह्य केले आहे.
१५ ते ३० एप्रिलदरम्यान पार पडलेल्‍या या शिबिरात योगाभ्यास, ध्यानधारणा, आर्टिस्टिक योगा, खेळ आणि हस्तकला आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थी कुठे-कुठे मागे पडतात, हे शिक्षकांनादेखील कळवल्‍याने त्‍यांनाही आता मुलांवर लक्ष देता येईल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.
कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केले होते. आमच्या सहाय्यकांनी या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शाळेत परत आणण्यात मोलाची भूमिका बजावली. शाळेत परत आलेल्यांपैकी अनेक मुले शिक्षणात मागे पडली होती. या उन्हाळी शिबिराने त्यांच्या या समस्येवर चांगला उपाय मिळाला, असेही ते म्‍हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com