बेस्ट दरवाढीला विरोध

बेस्ट दरवाढीला विरोध

‘बेस्ट’च्या तिकीट दरवाढीला विरोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः बेस्ट प्रशासन बसच्या तिकीट दरांमध्ये वाढ करणार असल्याचे समजत आहे; मात्र बस गाड्यांची अवस्था खराब असताना अशा प्रकारे दर वाढ करणे अन्यायकारक असल्याचे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी म्हटले आहे. बेस्टच्या दरवाढीला आमचा विरोध असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रवी राजा यांनी सांगितले की, बेस्ट प्रशासन बसच्या तिकिटांमध्ये वाढ करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळत आहे; पण दरवाढ करण्याआधी बेस्टने आपली सेवा सुधारण्याची गरज आहे. बेस्टच्या बस वेळेत धावत नाहीत, बसची अवस्था फारशी चांगली नाही, बेस्टचे अॅप नीट काम करत नाही आहे. या सगळ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. बेस्टच्या सेवेबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मिनी बसच्या एसी नादुरुस्त आहेत. त्यांची अवस्थाही खराब आहे. असे असताना बेस्ट प्रशासन कशाच्या आधारावर दरवाढीचा विचार करत आहे, असा सवालही रवी राजा यांनी विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com