वृद्धाच्या अवयवदानातून तिघांना नवसंजीवनी

वृद्धाच्या अवयवदानातून तिघांना नवसंजीवनी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुलुंडमधील एका वृद्धाने निधनानंतरही तीन जणांना नवजीवन दिले आहे. या वृद्धाच्या कुटुंबीयांनी त्याला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्याचे यकृत आणि किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.
मुलुंड येथील ६७ वर्षीय जवेरी लाल गाला यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने दक्षिण मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. ब्रेनडेड घोषित केल्यानंतर ८ मे रोजी डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी वृद्धाचे यकृत आणि किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
मुलगा पार्थ याने सांगितले की, त्याचे वडील सुरुवातीपासून गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच पुढे होते. छोटासा व्यवसाय असूनही ते आपल्या कमाईतून लोकांना मदत करत राहिले. त्यांचा हा स्वभाव लक्षात घेऊन आम्ही त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या दुःखाच्या प्रसंगी रुग्णालय प्रशासनानेही कुटुंबाच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले.
...
वर्षातील १६ वे अवयवदान
झेडटीसीसी समन्वयक ऊर्मिला महाजन म्हणाल्या, या नवीन वर्षात अवघ्या पाच महिन्यांत १६ ब्रेनडेड रुग्णांपैकी दोन डझनहून अधिक रुग्णांना अवयवदानातून नवीन जीवन मिळाले आहे. अवयवदानाची प्रकरणे वाढत आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अधिक अवयवदान झाले आहेत. २०२३ मध्ये ५० ब्रेनडेड रुग्णांमधून १४४ जणांना अवयवदानातून नवजीवन मिळाले, तर २०२२ मध्ये ४७ ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानातून १२४ जणांना जीवनदान मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com