परिचारिका दिनानिमित्त विविध उपक्रम

परिचारिका दिनानिमित्त विविध उपक्रम

मुंबई : सर जे. जे. समूह रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त विविध उपक्रम आणि जनजागृती अभियान राबवण्यात आले. परिचारिका सप्ताह हा आधुनिक परिचारिका व्यवसायाच्या आद्य जनक फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या स्मरणार्थ करण्यात येतो. यानिमित्त अवयवदान जनजागृती अभियान, मासिक पाळी व स्त्रियांच्या आरोग्याबाबत जनजागृती, वक्तृत्व स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या कांताबेन पारेख, सोशल परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अपर्णा संखे, विद्यार्थी समन्वयक हेमलता गजबे, विद्यार्थी प्रतिनिधी, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दीप प्रज्वलन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक व केक यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सादर करत असताना लॉरेन्स नाईटिंगल यांच्या चरित्राविषयी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व समजून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com