दक्षिण मध्य मुंबईत प्रचाराचा जोर

दक्षिण मध्य मुंबईत प्रचाराचा जोर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी (ता. १२) सकाळी मॉर्निंग वॉकवर भर देत लोकांशी संवाद साधला. त्यांनी माटुंग्याच्या फाईव्ह गार्डन येथे नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी शेवाळे यांनी ओपन जिममध्ये व्यायाम करत ‘फिट इंडिया’चा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन यावेळी शेवाळे यांनी उपस्थित रहिवाशांना केले. तर सायंकाळी मंत्री आदिती तटकरे आणि आमदार प्रसाद लाड यांच्या वडाळा येथे सभा झाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाईंनी सकाळपासूनच नागरिकांच्या भेटीगाठींवर जोर दिला. त्यांनी वडाळा भक्ती पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घेतल्या. सायंकाळी त्यांनी चेंबूर परिसरात प्रचारफेरी काढली. सायंकाळी अणुशक्तीनगर येथे उद्धव ठाकरे तर सायन कोळीवाडा येथे आदित्य ठाकरे यांची सभा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com