शनिवारपासून उन्हाळी सत्र परीक्षा

शनिवारपासून उन्हाळी सत्र परीक्षा

मुंबई, ता. १५ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेला शनिवारी (ता. १८) सुरुवात होणार आहे. त्या तीन जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली. राज्यातील ३९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेत एमबीबीएस (ओल्ड/सीबीएमई-२०१९) पदवी व वैद्यकीय पदव्युत्तर विद्याशाखांचे एकूण अंदाजे तीन हजार १८८ विद्यार्थी प्रविष्‍ट होणार आहेत. उत्तरपत्रिकांचे त्याच दिवशी संबंधित परीक्षा केंद्रांवर स्कॅनिंग करून केंद्रीय मूल्यांकन केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने मूल्यमापन केले जाणार आहे. परीक्षेबाबतची अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही विद्यापीठाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com