const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();
बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात

बेकायदा होर्डिंग हटवण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : घाटकोपरमधील छेडानगर परिसरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता उभारलेले तीन जाहिरात फलक (होर्डिंग) हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. रेल्वे प्रशासनालाही त्यांच्या हद्दीतील बेकायदा फलक हटवण्याची नोटीस पालिका प्रशासनाने दिली आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईत वाऱ्याच्या वेगामुळे बाधा येत असून पुढील १० दिवसांत होर्डिंगवरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मध्‍य रेल्‍वे आणि पश्चिम रेल्‍वे हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्‍वे प्रशासनाने तातडीने हटवावेत, अशी नोटीस महापालिका प्रशासनाने आपत्ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३० (२) (व्‍ही) अन्‍वये बजावली आहे. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळी भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

महापालिका प्रशासनाने छेडानगर परिसरातील आणखी तीन जाहिरात फलक विनापरवाना उभारण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे. मालाड (पश्चिम) येथील एम. एम. मिठाईवाला या दुकानावर १५ बाय १० आकाराचा चहूबाजूने उभारलेला अनधिकृत जाहिरात फलक काढण्यात आला आहे. पी उत्तर विभागातील अनुज्ञापन खात्यामार्फत एक निरीक्षक, चार कामगार यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
........
रेल्वेला नोटीस
मुंबई जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण या नात्‍याने महापालिकेने मध्‍य आणि पश्चिम रेल्‍वेचे विभागीय अभियंत्यांना नोटीस पाठविली आहे. रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत नियमबाह्य आकाराचे म्‍हणजे ४० बाय ४० फूटपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक असल्‍यास ते तातडीने काढण्‍याचे निर्देश या नोटिशीद्वारे देण्‍यात आले आहेत. घाटकोपर दुर्घटनेसारखा प्रसंग पुन्‍हा उद्‌भवू नये यासाठी रेल्‍वे प्रशासनाने मोठ्या आकाराचे सर्व जाहिरात फलक तातडीने काढण्‍याचे निर्देश नोटिशीद्वारे दिले आहेत.
-----
अनेक ठिकाणी विनापरवाना फलक
मुंबईची भौगोलिक स्थिती तसेच समुद्र किनाऱ्याला लागून असलेला प्रदेश लक्षात घेता पर्यायाने हवामान व वाऱ्याची स्थिती पाहता या आकाराचे जाहिरात फलक लावण्‍यास महापालिका प्रशासन परवानगी देत नाही. असे असताना रेल्‍वे प्रशासनाच्‍या हद्दीत महापालिका रस्‍ते/खासगी जागा, बांधकामांलगत नियमबाह्य आकाराचे जाहिरात फलक उभारल्‍याचे आढळले आहे.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com