मुंबईतील तापमानात वाढ :  उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

मुंबईतील तापमानात वाढ : उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

मुंबईतील तापमानात वाढ
उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कमाल वातावरणात वाढ होऊन पारा ३७.६ अंशांवर गेल्याने आज मुंबईत पुन्हा एकदा उन्हाचे चटके जाणवले. मुंबईत उष्णतेची लाट सक्रिय झाली असून गुरुवारी (ता. १६) देखील तिची दाहकता जाणवणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तवला आहे. यामुळे दुपारच्या सत्रात घराबाहेर पडू नका, यादरम्यान आवश्यक ती काळजी घ्या, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.
मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबईतील कमाल तापमान ३७ अंशांच्या वर पोचले. आज कुलाबा ३७.६ अंश, तर सांताक्रूझ ३७.२ कमाल तापमान नोंदले गेले. आर्द्रताही अनुक्रमे ६६ आणि ५६ टक्के इतकी होती. तापमानासोबत आर्द्रता वाढल्याने आज प्रचंड उकाडा जाणवला. गुरुवारी शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुपार/संध्याकाळी वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७ अंश सेल्सिअस आणि २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com