

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महापालिका रुग्णालयांमधील मागील काही वर्षांपासून रुग्णांचा वाढता ओघ पाहता उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार करण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. बोरिवलीतील श्री. हरिलाल भगवती (एन.सी.टी.) सर्वसाधारण रुग्णालयाचा विस्तार करून त्या ठिकाणी मोठी इमारत बांधून गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध केल्या जाणार आहेत; मात्र या इमारतीच्या कामाकरिता नेमलेल्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले असून कामांच्या संदर्भात विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याबाबत माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
रवी राजा यांनी सांगितले की, सभागृहामध्ये रुग्णालय इमारत बांधकामाबाबतचा विषय मंजुरीकरिता आला होता. सभागृहात असा विषय आल्यानंतर अशा कंत्राटदारांवर महापालिकेचा वचक असणे महत्त्वाचे असल्याचे मत लोकप्रतिनिधी म्हणून वेळोवेळी व्यक्त केले आहे. याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करून संबंधित कंत्राटदारांना पाठीशी घालतात, अशी शंका निर्माण होते. संबंधित कंत्राटदार कंत्राटातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून आपली मनमानी करीत असेल, तर ही बाब योग्य नाही.
महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे महानगरपालिकेचे प्रथम कर्तव्य असताना कंत्राटदाराने अशा प्रकारे काम करणे हा तमाम मुंबईकरांचा अपमान आहे. त्यामुळे अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयाच्या कामाकरिता देण्यात आलेल्या कंत्राटातील अटी व शर्तींचे संबंधित कंत्राटदाराने उल्लंघन केलेले असल्यास त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ही रवी राजा यांनी केली आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.