बी.एस्सीचा निकाल ३० दिवसाआधीच जाहीर

बी.एस्सीचा निकाल ३० दिवसाआधीच जाहीर

बी.एस्सीचा निकाल ३० दिवसांआधीच जाहीर
मुंबई विद्यापीठाचा नवा प्रयोग, एकही निकाल राखीव नाही


मुंबई, ता. २३: : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र सहाचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत २,०९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ही उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.५४ एवढी आहे. विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या निकालाबरोबरच विज्ञान शाखेचा निकालही ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे.
या परीक्षेत ८,२६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ७,९४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २,०९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ३,५९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल ३७.५४ टक्के एवढा लागला असून ३२१ विद्यार्थी अनुपस्थित होते. ४० विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवले आहेत, तर १,२५१ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने १,०६७ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत होती. याला सर्व प्राध्यापक व प्राचार्यांचे सहकार्य मिळाले. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी विशेष लक्ष दिले.
दरम्यान, या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवला नाही. मागील उन्हाळी सत्राच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकालही राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली होती. त्यानंतरच्या क्यूआर कोड पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत.
विद्यापीठाने आजपर्यंत २०२४च्या उन्हाळी सत्राचे ५३ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com