खड्ड्यांच्या तक्रारीसाठी मोबाईल ॲप

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी मोबाईल ॲप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईत सुरू असलेले रस्तेबांधणीचे काम ७ जूनपूर्वी पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या कंत्राटदारांकडून कंत्राटे काढून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्त्यांवरील खड्डे २४ तासांत भरणे बंधनकारक केले आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांबाबतच्या तक्रारीसाठी मोबाईल ॲपही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कंत्राटदार पालिकेच्या रडारवर आहेत.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. यातून सुटका करण्यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना करते. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आदेश रस्ते विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना यापूर्वीच दिले आहेत. जो खड्डा दिसेल तो तातडीने भरावा, असे आदेशात म्हटले आहे. यंदा खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. जिओ पॉलिमर आणि मस्तकी पद्धतीचा वापर करून रस्त्यांवरील खड्डे भरण्यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. खड्डे बुजवल्यानंतर तीन ते चार तासांत त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल, असे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी सांगितले. मात्र, तक्रार आल्यानंतर २४ तासांच्या आत खड्डे बुजवले गेले नाही तर कंत्राटदारावर कारवाई होणार आहे.
------------------------------------------
प्रभागवार अभियंत्यांची नियुक्ती
दरवर्षी पावसाळ्यात महापालिकेला खड्ड्यांच्या समस्येला सामोरे जावे लागते. यंदा महापालिकेच्या २२७ प्रभागांतील खड्ड्यांच्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी उपअभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अभियंते वॉर्डांमध्ये फिरून स्वत: तक्रारी पाहणार आहेत. तसेच तक्रार आल्यानंतर झोननिहाय नियुक्त कंत्राटदारामार्फत खड्डे भरले आहेत की नाही याची खातरजमा करू. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारीही या सर्व अभियंत्यांकडे करता येतील. त्यांचे क्रमांकही जाहिरातींद्वारे उपलब्ध करून दिले जात आहेत.
--------------------------
नागरिकांनो येथे तक्रार करा

तक्रारीसाठी मोबाईल ॲप

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी महापालिकेने MyBMCPotholeFixIT हे मोबाईल ॲप तयार केले आहे. प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड केले जाऊ शकते. ॲपवर तक्रारीसोबत खड्ड्यांची छायाचित्रे आणि ठिकाण अपलोड करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com