निवडणूक निकालावर पावसाचे सावट

निवडणूक निकालावर पावसाचे सावट

निवडणूक निकालावर पावसाचे सावट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी मुंबईत ढगाळ वातावरण असल्याने उद्याच्या निकालावर पावसाचे सावट असल्याचे दिसते. मुंबईत आज बऱ्याच भागात ढगाळ वातावरण होते, तर नवी मुंबई, ठाणे या मुंबईलगतच्या भागात पाऊस झाला. मुंबईतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे सोमवारी (ता.३) मुंबईतील आर्द्रताही प्रचंड वाढली होती. आज कमाल तापमान कुलाबा ३५.६, सांताकृझ ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर आर्द्रता अनुक्रमे ६६ आणि ५९ टक्के नोंदवली गेली. त्यातच उद्या देखील कमान तापमान ३५ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून आर्द्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे उद्याही मुंबईकरांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. परिणामी मतमोजणीवर उकाड्याचा किंवा पावसाचा मारा होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com