शिक्षक, पदवीधर मतदारसंघात चुरस

शिक्षक, पदवीधर मतदारसंघात चुरस

मुंबई, ता. ३ : शिक्षक मतदारसंघातून भाजपने पदवीधरसाठी भाजपचे किरण शेलार आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून विद्यमान भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे; तर शिक्षक मतदारसंघातून परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने तब्बल १२ वर्षांनंतर राज्य शिक्षक परिषदेला या मतदारसंघातून उमेदवारीची संधी मिळाली आहे.
मुंबईत शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचा मोठा दबदबा होता. अठरा वर्षांपूर्वी शिक्षक परिषदेचे शरद यादव यांचा शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांच्याकडून पराभव झाल्यानंतर या मतदारसंघात परिषदेला नीट यश मिळवता आलेले नाही. गेल्या निवडणुकीत परिषदेच्या अनिल बोरनारे यांना ऐनवेळी भाजप पुरस्कृत उमेदवार अनिल देशमुख यांच्यासाठी माघार घ्यावी लागली होती; तर पदवीधरमध्ये भाजपला फार यश आले नव्हते. यावेळी शिक्षक परिषदेसह अभाविप, विविध संघटनांच्या जोरावर भाजपने शिक्षक परिषदेचे कार्यवाह असलेले शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिल्याने तब्बल एक तपानंतर शिक्षक परिषदेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
--------------------------------------
निवडणूक रंजक होणार
मुंबई शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव नलावडे, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून ज. मो. अभ्यंकर, शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे मैदानात आहेत; तर दुसरीकडे खासगी इंग्रजी शाळा संस्थाचालकांकडून उमेदवार जाहीर केला जाणार आहे; तर मुंबईत भाजप शिक्षक आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अनिल बोरनारे यांना भाजपकडून उमेदवारी दिली नसल्याने कार्यकर्त्यांशी विचारणा करून अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने मुंबई पदवीधरपेक्षा मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरणार आहे.
--------------------------------------------
काँग्रेसच्या रमेश कीर यांचा अर्ज दाखल
काँग्रेस पक्षाचे रमेश कीर यांनी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून सोमवारी (ता.३) उमेदवारी अर्ज दाखल केला. कीर यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा दळवी, राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम गोकुळ पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com