उत्तर पश्चिम मतदारसंघात निकालानंतर गोंधळ

उत्तर पश्चिम मतदारसंघात निकालानंतर गोंधळ

उत्तर पश्चिम मतदारसंघात निकालानंतर गोंधळ
मुंबई, ता. ४ : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल २६व्या फेरीपर्यंत जाहीर झाला आणि त्यानंतर गोरेगावच्या नेस्को मतदान केंद्राबाहेर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने येथील वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांना सक्रिय होऊन परिस्थिती हाताळावी लागली.
अखेरच्या क्षणापर्यंत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे आघाडीवर असल्याने नेस्कोच्या बाहेर दुपारनंतरच कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली होती. हातात झेंडे आणि बँडबाजा घेऊन कार्यकर्ते तयार होते; मात्र अखेरच्या क्षणी कीर्तिकर यांच्याऐवजी वायकर यांच्या विजयाची घोषणा होताच ‍कीर्तिकर यांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दुसरीकडे वायकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ऐनवेळी ढोल-ताशे मागवून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com