’धोकादायक इमारतींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश’

’धोकादायक इमारतींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश’

धोकादायक इमारतींबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी निश्चित करून तातडीने कार्यवाही करावी, स्थानिकांचे स्थलांतर सुयोग्य ठिकाणी करावे, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बुधवारी (ता. ५) सर्व संबंधित यंत्रणांना दिले. तर दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणी सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा आपत्‍कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी दिले. महापालिका मुख्यालयात पावसाळापूर्व समन्वय बैठक पार पडली. त्‍यावेळी महानगरपालिकेच्या व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना त्‍यांनी निर्देश दिले. यावेळी पोलिस विभागासह, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, तटरक्षक दल, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), एमटीएनएल, मुंबई अग्निशमन दल आणि सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, विविध रुग्णालये, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अश्विनी जोशी यांनी महापालिका क्षेत्रातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी निश्चित करून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात. स्थानिकांचे योग्यप्रकारे स्थलांतर करावे, सर्व २४ विभागांच्या सहायक आयुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांची नियमितपणे पाहणी करण्याचे निर्देश दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com