‘संज्या छाया’त रसिक झाले मंत्रमुग्ध

‘संज्या छाया’त रसिक झाले मंत्रमुग्ध

‘संज्या छाया’त रसिक झाले मंत्रमुग्ध
‘सकाळ’ आयोजित चंद्रकांत कुलकर्णी नाट्य महोत्सवाचा समारोप

मुंबई, ता. ९ : ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या रंगभूमीवरील चार दशकांच्या कारकिर्दीनिमित्त ७ जून रोजी सुरुवात झालेल्या ‘सकाळ’ आयोजित नाट्य महोत्सवाची आज ‘संज्या छाया’ या नाटकाच्या सादरीकरणाने सांगता झाली. या नाटकातील आशयांकित मनोरंजनात रसिक मंत्रमुग्ध झाले.
प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘संज्या छाया’ या कलाकृतीद्वारे महोत्सवाचे चौथे पुष्प गुंफले. या नाटकातील कलावंत निर्मिती सावंत, वैभव मांगले, योगिनी चौक-बोऱ्हाडे, अभय जोशी, देवेंद्र जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे यांनी वठवलेल्या भूमिकांनी रसिकमने जिंकली. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या गौरवशाली कारकिर्दीच्या सन्मानार्थ सकाळ समूहामार्फत विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचे वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रायोजक, तर पितांबरी उद्योग समूह सहप्रायोजक होते. तीनही दिवस मुंबईतील प्रेक्षकांनी नाटकांना आपली उपस्थिती लावून आगळावेगळा नाट्यानुभव घेतला. तीन दिवस चाललेल्या या नाट्यमहोत्सवामध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ‘संज्या छाया’सह कुलकर्णी यांची निर्मिती असलेले ‘आज्जीबाई जोरात’ हे पहिलेवहिले ‘एआय महाबालनाट्य’ याचे सादरीकरण करण्यात आले. समारोपप्रसंगी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कारकिर्दीला सलाम केला.
...
वाचकांचा मोठा प्रतिसाद
या नाट्यमहोत्सवाच्या प्रत्येक नाटकासाठी सकाळ माध्यम समूहामार्फत ‘सकाळ’च्या वाचकांसाठी खास सवलत देण्यात आली होती, तर नाट्यगृहावर सकाळचा अंक दाखवा आणि सवलत घ्या, अशी योजनादेखील राबवण्यात आली होती. त्यालाही नाट्य रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com