गणवेशावरून पुन्हा संभ्रम

गणवेशावरून पुन्हा संभ्रम

गणवेशावरून पुन्हा संभ्रम
शिक्षण विभागाचा पुन्हा नवा आदेश

मुंबई, ता. १० : राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी राज्यात एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आज जीआर जारी केला आहे; मात्र यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
नवीन आदेशाप्रमाणे आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला असून तर उर्वरित दिवशी म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे तीन दिवस स्काऊट आणि गाईडचे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत गणवेशावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा सुरू होण्यासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी उरलेला असताना अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी जारी केल्याने यावर शिक्षणतज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय रखडला होता. आता ही अंमलबजावणी २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू केली जाणार आहे; मात्र गणवेशासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून धोरणात अनेकदा बदल केले जात असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत गणवेश योजना राबवली जाते. यात लोकसभा निवडणुकीपूर्वी एक राज्य एक गणवेश धोरण निश्चित करण्यात आले होते; मात्र आता पुन्हा धोरणात बदल करून तीन दिवस नियमित गणवेश आणि तीन दिवस स्काऊट- गाईडप्रमाणे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत.
...
असे आहेत नियम
- पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्काऊट- गाईडच्या गणवेशाप्रमाणे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत.
- पहिली ते चौथीच्या मुलींना नियमित गणवेशामध्ये आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आणि स्काऊट आणि गाईडप्रमाणे गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक असतील.
- सहावी ते आठवीच्या उर्दू माध्यमातील मुलींना आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी असेल.
- स्काऊट आणि गाईडसाठी गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज, सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी असेल.
- पहिली ते आठवीतील मुलांना आकाशी रंगाचा शर्ट, हाफ पँट आण‍ि फुल पॅंट आणि स्काऊटसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पँट असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com