पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीस मुदतवाढ

मुंबई, ता. १० : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पदवीच्या तीन आणि चार वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मंगळवार ११ जून २०२४ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही मुदतवाढ असून या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी ते संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या महाविद्यालयांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरणेदेखील अनिवार्य आहे. मुंबई विद्यापीठामार्फत प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २५ मे २०२४ ते १० जून २०२४ या कालावधीत ऑनलाईन नावनोंदणी ते संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्यास काही अपरिहार्य कारणास्तव नोंदणी ते अर्ज सादर करण्यास उशीर झाला असल्यास त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने ही मुदतवाढ दिली जात असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com