मुंबईत सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज

मुंबईत सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज

मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज
सरासरीपेक्षा २ ते ३ टक्के अधिक पाऊस पडण्याचा हवामान विभागाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबी, ता. ११ : मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने व्यक्त केला आहे. यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा २ ते ३ टक्के अधिक पावसाची शक्यता आहे. हा पाऊस टप्प्याटप्प्याने पडणार असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.

गेल्या वर्षी पाऊस साधारण होता. यंदा मॉन्सून अपेक्षित वेळेच्या दोन दिवस आधी दाखल झाला असून त्याची प्रगती व्यवस्थित सुरू आहे. मुंबईत दर वर्षी सरासरी २३०० मि.मी. पाऊस होतो. या वेळी अधिक पावसाची शक्यता असून यंदा १०६ टक्के पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित असून तो सरासरी पेक्षा २ ते ३ टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. मुंबईत जूनपेक्षा जुलैमध्ये मोठ्या पावसाची अधिक शक्यता आहे. मुंबईत साधारणतः जूनमध्ये ५०० मि.मी., जुलैमध्ये ९०० मि.मी.; तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ९०० मि.मी. पाऊस येतो. या वेळीदेखील काहीशी अशीच स्थिती असेल, असा अंदाज आहे. मुंबईसह यंदा राज्यात चांगला पाऊस अपेक्षित असला, तरी तो एकाच वेळी पडण्याची शक्यता नाही. काही दिवस पावसात खंड पडू शकतो; तर कधी कमी वेळात अधिक पाऊस होईल. हा सर्व वातावरण बदलाचा परिणाम असल्याचेही सुनील कांबळे यांनी सांगतिले. पाऊस किंवा वादळांबाबत समाजमाध्यमांवर अनेक पोस्ट व्हायरल होत असतात; पण त्यात अनेकदा काहीही तथ्य नसते; मात्र यामुळे लोकांमध्ये संभ्रम किंवा भितीचे वातावरण पसरते. यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवण्यापेक्षा हवामान विभागाची अधिकृत वेबसाईट चाळून माहिती घ्यावी, असे आवाहन सुनील कांबळे यांनी केली.

...
पावसाची दांडी
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने मुंबई तसेच आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मुंबई, पालघरसाठी येलो अलर्ट, ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी यलो अलर्टही जारी केला होता; मात्र मुंबईत मंगळवारी (ता. ११) दिवसभर पावसाने पाठ फिरवल्याचे दिसले. त्यातच आर्द्रता वाढल्याने पुन्हा एकदा उकाडा सहन करावा लागला; तर उद्या (बुधवार) मात्र आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज असून शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com