अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी प्रवेशासाठी लवकरच कॅप राऊंड

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, 
कृषी  प्रवेशासाठी लवकरच कॅप राऊंड
Published on

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र,
कृषी प्रवेशासाठी लवकरच कॅप राऊंड
उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांचे समाधान
मुंबई, ता. २ : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या एमएचटी-सीईटी-२०२४ या परीक्षेच्या उत्तरपत्रिका (ॲन्सर की) सर्व विद्यार्थ्यांना दोन दिवस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचे समाधान झाल्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्‍यामुळे या प्रवेशाच्या कॅप राऊंडला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
एमएचटी-सीईटी-२०२४ या सामायिक प्रवेश परीक्षेत ग्रेस मार्क आणि काही विद्यार्थ्यांना अधिकचे पर्सेंटाईल देण्यात आल्याचा दावा करत काही संघटनांनी आक्षेप घेतले होते. त्यात ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी हा विषय राज्यपालांपर्यंत नेला होता. त्यामुळे सीईटी सेलने या परीक्षेत कोणतेही ग्रेस मार्क दिले नाहीत, ही परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे घेण्यात आल्याचा खुलासा केला होता, तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पर्सेंटाईल आणि गुणांवर काही आक्षेप आहेत, त्यांना आपली गुणपत्रिका पाहण्यासाठी त्यांना दोन दिवस ऑनलाईन सवलत उपलब्ध करून दिली होती. त्यात राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे समाधान झाले आहे. उत्तरपत्रिका उपलब्ध करून दिल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या नाहीत, त्यामुळे बहुतेकांचे समाधान झाले असल्याने एमएचटी-सीईटी-२०२४ परीक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लवकरच कॅप राऊंड आणि त्याचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

असा झाला होता निकाल जाहीर
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या एमएचटी-सीईटी-२०२४  या परीक्षेत पीसीएम ग्रूपमध्ये तब्बल २० जणांनी, तर पीसीबी ग्रूपमधून १७ अशा एकूण ३७ जणांनी १०० पर्सेंटाईल मिळवले होते. या परीक्षेला एकूण सात लाख २५ हजार ५२ जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी परीक्षेला बसलेले सर्व  सहा लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थी  पात्र ठरले होते, तर एकूण ९३.१५ टक्के इतका निकाल लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com