अशासकीय केंद्रात रक्त संकलन अधिक

अशासकीय केंद्रात रक्त संकलन अधिक

Published on

अशासकीय केंद्रांत रक्त संकलन अधिक
शासनाकडे १८ टक्के रक्त संकलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यात अशासकीय रक्त केंद्रांची संख्या ही शासकीय रक्त केंद्रांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे रक्त संकलनात तफावत दिसून येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत आमदार श्रीकांत भारतीय यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी ही माहिती दिली. काही अशासकीय केंद्रांवर रक्तासाठी जादा दर आकारले जात असल्याचेही त्यांनी कबूल केले.
राज्यात सन २०२३-२४ मध्ये शासकीय रक्त केंद्रांमध्ये अशासकीय रक्त केंद्रांच्या तुलनेत १८.८४% रक्त संकलन झाले आहे. राज्यामध्ये शासकीय व महानगरपालिका संचलित एकूण ७६ रक्त केंद्रे कार्यरत आहेत. तसेच ३०२ अशासकीय रक्त केंद्रे कार्यरत आहेत. सदर शासकीय व महानगरपालिका संचलित रक्त केंद्रांमध्ये २०२३-२४ या कालावधीमध्ये एकूण ३,९१,७७४ युनिट व अशासकीय रक्त केंद्रांमध्ये १६,८७,४२४ युनिट रक्त संकलन झाल्याची माहिती तानाजी सावंत यांनी दिली.
शासकीय रक्तपेढ्यांमधून रुग्णाला मोफत रक्त उपलब्ध होत असताना खाजगी रक्तपेढीमार्फत रक्ताच्या प्रतिपिशवीकरीता अंदाजे रुपये १,५५० इतके अथवा त्यापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येते. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हे काही प्रमाणात खरे असल्याची कबुली दिली. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत शासकीय व अशासकीय रक्त केंद्रांचे रक्त व रक्तघटक यांचे प्रक्रिया शुल्क निश्चित करण्यात येते. त्यानुसार आरोग्य विभागाच्या शासन निर्णय ८ फेब्रुवारी २०२३ प्रमाणे शासकीय रक्त केंद्रात प्रक्रिया शुल्काचे दर रुपये ११०० प्रतिबॅग असून अशासकीय रक्त केंद्रांसाठी रुपये १५५० प्रतिबॅग आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत रक्त केंद्रांमधून शासकीय रुग्णालयात आंतररुग्णास गरजेनुसार विनामूल्य रक्त पुरवठा करण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.

रक्त संकलन वाढवण्यासाठी उपाययोजना
राज्यात शासकीय व महानगरपालिका संचलित एकूण ७६ रक्त केंद्रे कार्यरत आहेत, सदर रक्त केंद्रांमार्फत २०२३-२४ या कालावधीत एकूण ३,९१,७७४ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. शासकीय रक्त केंद्रे ही गरजेप्रमाणे स्वैच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन करतात. रक्त केंद्रातील अतिरिक्त साठा ज्या रक्त केंद्रामध्ये रक्ताची गरज आहे, त्या रक्त केंद्रात आवश्यकतेनुसार स्थंलातरित करण्यात येतो. धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करतात, त्यासाठी शासकीय रक्त केंद्रांना प्राधान्याने रक्त संकलनासाठी बोलावण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.