

आंदोलकांचे आरोग्य धोक्यात
आझाद मैदानात अस्वच्छता, मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी एकवटले
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी अनेक आंदोलक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात ठिय्या मारून आहेत. गेल्या २२ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न येथील अस्वच्छतेमुळे निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू झाल्याने आंदोलनकर्त्यांना ताप, पोटदुखी, जुलाब, उलट्या या आजारांचा त्रास होत आहे.
सध्या आझाद मैदान आंदोलकांनी भरले आहे. महापालिका आरोग्यसेवा कर्मचारी संघटना, म्युनिसिपल आशा सेविका, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन अशा चार वेगवेगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या मैदानावर आंदोलन पुकारले आहे.
..........
डेंगी झाला पण प्रशासनाला काळजी नाही -
गेल्या १५ दिवसांपासून मला सतत तापाचा त्रास होत होता, त्यानंतर डोळे सुजले, पाय दुखत होते. त्रास सुरू झाल्याने जोगेश्वरीतील पालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल झाले. तपासण्या केल्यानंतर डेंगीचे निदान झाले. रक्तपेशी कमी झाल्या होत्या.
वैशाली संदीप पगारे, पी दक्षिण, आरोग्य सेविका
.........
मी वॉर्ड प्रतिनिधी असल्यापासून मला रोज आंदोलनाला यावे लागते, पण येथे स्वच्छता नसल्याने घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने बाहेर जावे लागते.
कल्पना काजरेकर, एम पश्चिम, आरोग्य सेविका
.......
मैदानावर स्वच्छता नसल्याने गेल्या चार दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. आम्ही प्रशासनाची काळजी घेतो, पण लाडक्या आरोग्य सेविका म्हणून सरकारने साधी आमची विचारपूसही केली नाही.
वनिता मगरे, एन वॉर्ड, आरोग्य सेविका
......
आंदोलकांमध्ये सर्वाधिक महिला आहेत. त्यामुळे त्यांना अधिक समस्या येथे जाणवत असूनही याकडे कोणाचेही लक्ष नाही.
अरुणा सावंत, एस वॉर्ड, आरोग्य सेविका
.....
पावसामुळे मैदानावरील खड्ड्यात पाणी साठल्याने दुर्गंधीही पसरली आहे. पालिकेकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्याने डासांचेही प्रमाण वाढले आहे.
विठ्ठल सोनवणे, रिपब्लिकन झोपडी संघ
........
महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी अधिवेशनातून येथे आलो आहे. आशा सेविकांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार असून हा प्रश्न मार्गी कसा लागेल यासाठी प्रयत्न करणार आहे.
शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.