टंकलेखन चाचणीत तांत्रिक अडचणी

टंकलेखन चाचणीत तांत्रिक अडचणी

Published on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा- २०२३ लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता १ जुलै रोजी होणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टीसीएस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत १ ते १३ जुलै रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात आली आहे. १ जुलै रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना या चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन ही चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, सर्व उमेदवारांना चाचणीची सुधारित तारीख लवकरच घोषित करण्यात येईल, असे आयोगाने कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.