सर्व शाळांमध्ये ३० जुलैपर्यंत गणवेश

सर्व शाळांमध्ये ३० जुलैपर्यंत गणवेश
Published on

मुंबई, ता. २ ः केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४ लाख ६० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून येत्या ३० जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गणवेश उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीतील वस्त्रोद्योग कमिटीकडून गणवेशाच्या कापडाचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले. त्यानुसार कापडाची खरेदी प्रक्रिया ई निविदाद्वारे राबवण्यात आली. त्यानंतर कापड पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली. पुरवठादारामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या कापडापासून विद्यार्थ्यांचे गणवेष शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थानिक महिला बचत गटांना दिल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. राज्यात १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले. विदर्भात ३० जूनपासून शाळा सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना विहित कालावधीत दोन्ही गणवेश उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
--------------------------------------
शिलाईचे युद्धपातळीवर काम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने देण्यात येत असलेले गणवेश सभागृहात दाखवून अशा प्रकारचे गणवेश विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याची माहिती दिली होती. दोन गणवेशापैकी एक गणवेश महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शिलाई करून देण्यात येणार आहे; तर स्काऊट व गाईड्सच्या गणवेशाचे कापड शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहे. त्यामुळे गणवेश चांगल्या दर्जाचे असतील, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com