चर्मकार समाजाच्या व्यावसायिकांना फायबरचे स्टॉल मिळणार

चर्मकार समाजाच्या व्यावसायिकांना फायबरचे स्टॉल मिळणार

Published on

चर्मकार समाजाच्या व्यावसायिकांना फायबरचे स्टॉल मिळणार
मंत्री गुलाबराव पाटील, सरकार मुलांना प्रशिक्षण देणार

मुंबई, ता. ३ : चर्मकार समाजाच्या व्यावसायिकांना फायबरचे स्टॉल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, तर या समाजाच्या मुलांना गोवंडी येथे दोन एकर जागेवर प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. लोकांच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून मेहनत करणाऱ्या चर्मकारांसाठी स्टॉलचीही चांगली योजना नाही. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी सरकार प्रयत्न करणार का, असा सवाल विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर पाटील यांनी उत्तर दिले आहे.

चर्मकार समाजाच्या व्यावसायिकांना चांगले स्टॉल द्यावेत, त्यामुळे त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल. तसेच त्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळाले व त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली, तर त्यांची निर्मिती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणार आहे. या समाजातील कर्जदारांचे ९८ कोटी रुपये शासनाने माफ करावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
या समाजाच्या व्यावसायिकांना फायबरचे स्टॉल देण्याचा निर्णय आचारसंहितेमुळे थांबला होता. याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवून समाजाच्या संबंधित आमदारांसह बैठक बोलावून निर्णय घेऊ, तसेच देवनार व वांद्रे येथील चर्मकार महाविद्यालय आणि तंत्र प्रशिक्षण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे या समाजाच्या मुलांना गोवंडी येथे प्रशिक्षण देऊ, असेही पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.