मुंबई विद्यापीठातील पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती

मुंबई विद्यापीठातील पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती

Published on

मुंबई विद्यापीठातील पाहणीसाठी
विधिमंडळ सदस्यांची समिती
मुंबई, ता. ४ : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलामध्ये मुलींच्या वसतिगृहातील सुविधा याबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती कॅम्पसला भेट देऊन येथील सुविधांची पाहणी करणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत सांगितले.
याबाबत सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रश्‍नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ॲड. आशीष शेलार, अस्लम शेख यांनी भाग घेतला. मंत्री पाटील म्हणाले की, अनेक विद्यापीठे आता स्वायत्त आहेत. विद्यापीठ प्रशासन, त्यांच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. कलिना संकुल परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडे तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याबाबत प्रस्तावाचे सादरीकरण घेऊन योग्य प्रस्तावाची निवड करण्यात येईल. त्याद्वारे या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.