मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण रोखणार

मुलांचे ऑनलाईन लैंगिक शोषण रोखणार

Published on

मुंबई, ता. ४ : इंटरनेटच्या माध्यमातून होणारे बालकांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी अशा घटनांची माहिती व आकडेवारी, जनजागृती करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडियाने एकत्रित योजना आखल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी दिली.
इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असला तरी लहान मुलांविरोधातील लैंगिक गुन्हेगारीही वाढली आहे. त्यासाठी ‘वेब सेफ अँड वाईज ’ हा उपक्रम आखण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे वर्षभरात राज्यातील लैंगिक शोषणाची परिस्थिती काय आहे, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे, तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना, असे प्रकार घडल्यास त्यावर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, त्यांना प्रशिक्षणाबरोबर जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘चाइल्ड फंड इंडिया’ ही संस्था त्यासाठी सहकार्य करणार आहे. यासंदर्भातील करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी चाइल्ड फंड इंडियाचे राजेश सिंह, अमर कुमार सिंह, महिला व बालहक्क संरक्षण आयोगाचे डॉक्टर भालचंद्र चव्हाण, ॲड. नीलिमा चव्हाण आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
‘ऑनलाईन लैंगिक शोषण आणि अत्याचार, तसेच ऑनलाईन सुरक्षितता’ या विषयांवर मुलांसह पालकांमध्ये जागरूकता वाढण्यासाठी शाळा आणि विविध संस्थांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.
- सुशीबेन शहा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.