मुंबईत पावसाची संथगतीने वाटचाल

मुंबईत पावसाची संथगतीने वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : जुलै सुरू झाला तरी मुंबईत पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. पहिल्या तीन दिवसांत जेमतेम पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशाराही दिलेला नसल्याने जुलैचा पहिला आठवडा कोरडा जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
अपेक्षित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच मॉन्सून मुंबईत पोहोचल्याने दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत होती, मात्र त्यानंतर एकदाही मुसळधार पाऊस झालेला नाही. बहुतांश जून महिना कोरडाच गेला. अशातच जुलैमध्ये चांगला पाऊस होईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले होते, पण महिन्याची सुरुवात ही बऱ्यापैकी कोरडीच झाली आहे. जुलैच्या पहिल्या तीन दिवसांत अनुक्रमे ४२.३४,०.४८ आणि २.३२ मिमी पावसाची नोंद झाली. केवळ १ जुलैला समाधानकारक पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.
-------------------------------------------
मध्यम पावसाच्या सरी
हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात अधूनमधून मध्यम पावसाच्या सरीसह आकाश अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज वर्तवला आहे, तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४ अंश आणि २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com