मुंबई विद्यापीठात १५२ अनुदानित शिक्षकीय पदांची भरती

मुंबई विद्यापीठात १५२ अनुदानित शिक्षकीय पदांची भरती

Published on

मुंबई विद्यापीठात १५२ अनुदानित शिक्षकीय पदांची भरती
मुंबई, ता. ८ : मुंबई विद्यापीठात विविध १५२ अनुदानित शिक्षकीय पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी चार जागा, प्राध्यापक पदांसाठी २१ जागा, सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल पदांसाठी ५४ जागा आणि सहायक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल पदांसाठी ७३ पदांचा समावेश असून ही सर्व पदे अनुदानित तत्त्वावर भरण्यात येणार आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादींबाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता या पदांसाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या २२ सप्टेंबर २०२३ नुसार या पदांकरिता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत, अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२४ पर्यंत राहणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.