पंढरपूरत आषाढी निमित्त काय उपाययोजना करणार

पंढरपूरत आषाढी निमित्त काय उपाययोजना करणार

Published on

पंढरपुरात आषाढीनिमित्त काय उपाययोजना करणार?
अनुचित घटना घडू नये, यासाठी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक येतात. येथील चंद्रभागा नदीकाठावरील घाटाची दुर्दशा झाल्याने अपघात होण्याची शक्यता आज याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने याची दखल घेत घाटात कोणताही अपघात होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करणार त्याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सरकारला निर्देश दिले.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीकाठावरील घाट सुशोभीकरणाचे काम अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून सुरू आहे. मात्र, ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मुसळधार पावसात कुंभार घाटावरील निर्माणाधीन भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. घाट सुशोभीकरणाच्या कामात वापरण्यात साहित्य निकृष्ट दर्जाचे होते. दुर्घटनेतील दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करावी, कंत्राटदार कंपनीचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करत अ‍ॅड. अजिंक्य संगीतराव यांनी अ‍ॅड. राकेश भाटकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता. १०) यावर सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, विप्रा दत्त घाट, उद्धव घाटाची वाताहत झाली असून त्या ठिकाणी केवळ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

..
आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार
सरकारी वकील प्रिय भूषण काकडे यांनी न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, संबंधित ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. गेल्या दोन वर्षांत कोणताही अपघात झालेला नाही, यावर्षीसुद्धा अनुचित प्रकार घडणार नाही. न्यायालयाने याची दखल घेत सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी १६ जुलैपर्यंत तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.