घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवा!

घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवा!

Published on

घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवा!
न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटी पथकाकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी करत अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारीला फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिस नोऱ्हानो याने गोळ्या झाडून हत्या केली होती. मॉरिसने ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या ते पिस्तूल मॉरिसचा खासगी अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे होते. अमरेंद्र याच्याजवळ पिस्तूल असणे आवश्यक होते; मात्र या प्रकरणात त्याचा हलगर्जीपणा समोर आला. त्यामुळे शस्त्रास्त्र कायदा २९ (ब) व ३० अंतर्गत त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेचा सखोल तपास होणे आवश्यक असून या प्रकरणात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, तसेच एसआयटी नेमावी, अशी मागणी तेजस्वी यांनी न्यायालयाकडे केली आहे. तेजस्वी यांनी ॲड. भूषण महाडिक यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावरील सुनावणी सुरू होती. आज (ता. १०) या प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.