माळढोक अभयारण्य ‘एसईझेड’मधून वगळले
माळढोक अभयारण्य ‘ईएसझेड’मधून वगळले
राज्य वन्यजीव मंडळाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : माळढोक अभयारण्याच्या अधिसूचित पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तज्ज्ञ समितीच्या ५४व्या बैठकीत इकोसेन्सिटिव्ह झोनच्या तर्कसंगतीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रातील माळढोक पक्षी अभयारण्याबाबत चर्चा झाली होती. समितीच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या २०२४च्या निर्देशानुसार इकोसेन्सिटिव्ह झोनमधून क्षेत्र वगळण्यासाठी राज्याला सूचित करण्यात आले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन, महसूल आणि वन विभागाने अधिसूचनेद्वारे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील ७,८१८.४७ चौ.कि.मी. क्षेत्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा (अंशतः) कर्जत आणि श्रीगोंदा तहसील आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर असे एकूण ८,४९६.४४ चौ.कि.मी. क्षेत्र माळढोक पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढत माळढोक पक्षी अभयारण्याच्या सीमा बदलल्या आणि त्याची पुनर्रचना करून क्षेत्रफळ ३६६.७३ चौ.कि.मी. घोषित केले. माळढोक पक्षी अभयारण्याच्या निर्मितीचा उद्देश माळढोक पक्षी आणि संबंधित प्रजातींचे संवर्धन हा होता; परंतु अभयारण्याचे क्षेत्र हे एकसंघ नसून विविध खंडात विखुरले आहे. त्यात कृषी क्षेत्रे, गावे आणि महसुली जमिनी जंगलाच्या पट्ट्यांसह विखुरलेल्या आहेत. अभयारण्य शंभर वेगवेगळ्या पॅचमध्ये विभागले गेले आहे. येथे मानवी लोकसंख्येची घनताही जास्त आहे. दरम्यान, या निर्णयामुळे गावांच्या आणि उद्योगांचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
...
६०० चौ.कि.मी.चे क्षेत्र
भारत सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे १४ जानेवारी २०१९ रोजी माळढोक पक्षी अभयारण्याच्या सभोवताली इकोसेन्सिटिव्ह झोनबाबत मसुदा अधिसूचना प्रकाशित करत प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२० रोजी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या भारत सरकारच्या अधिसूचनेद्वारे माळढोक पक्षी अभयारण्याभोवती ४०० मीटरच्या मर्यादेपर्यंत ५९१.५२ चौ.कि.मी. क्षेत्र इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले. हा इकोसेन्सिटिव्ह झोनदेखील १०० पॅचमध्ये विभागला असून त्यात वनक्षेत्र नसलेल्या क्षेत्राचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.