फसवणूक प्रकरणात तिघांवर गुन्हा

फसवणूक प्रकरणात तिघांवर गुन्हा
Published on

मुंबई, ता.२७ : एसटी महामंडळासह विविध महापालिका, खासगी कंपन्यांना बस, कार भाड्याने देणाऱ्या कंपनीने २३ कोटींची फसवणुकीची तक्रार दहिसर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणी राजस्थानच्या व्योमजगदंबा लॉजिस्टिक्स कंपनीच्या तीन संचालकांविरोधात सोमवारी गुन्हा नोंदवला आहे.
विविध बँक, वित्तीय संस्थांकडून सकपाळ यांनी ६१० बस कर्ज काढून घेतल्या होत्या. त्यातील वसई-विरार महापालिकेकडे १३० तर १०७ शिवशाही बस एसटीकडे होत्या. मात्र, कोविड काळात भाडे मिळाले नसल्याने व्यवसाय तोट्यात गेल्याने सकपाळ यांनी बस विकून कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. यावेळी व्योमजगदंबा लॉजिस्टिक्स कंपनीचे संचालक वैभव शर्मा यांनी सकपाळ यांची भेट घेत उर्वरित बस विकून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच बँकेचे कर्ज वन टाईम सेटल करून देऊ, यातून जो नफा होईल तो उभय कंपन्या समान वाटून घेतील, असा प्रस्ताव ठेवला होता. करारानुसार कंपनी आठ महिन्यांत ३६४ बस विकणार होती. त्यातील ११७ बस २०२२ मध्ये शीळफाटा येथे उभ्या केल्या. मात्र, आठ महिन्यांनंतरही व्यवहार पूर्ण झाला नसल्याने सकपाळ यांनी शर्मा याच्याशी संपर्क साधला. तसेच शीळफाटा येथे असलेल्या ११७ बस जागेवर नसल्याचा जाब विचारला. पण शर्मा यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने या बस विकल्याचा संशय व्यक्त करताना सकपाळ यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com